क्रीडा विकासात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा महत्त्वाचा वाटा ः चंद्रकांत पाटील

  • By admin
  • April 9, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

पुणे ः खेळाडूंची पार्श्वभूमी त्याचे आजपर्यंतची कामगिरी तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूंची यापूर्वीची कामगिरी पाहून भविष्यात हा खेळाडू कशी कामगिरी करेल यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग निश्चितपणे होणार आहे. त्यामुळेच भविष्यामध्ये क्रीडा विकासात कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय (सीएसीपीई) आणि एमईएसचे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बीसी टू एडी’ अर्थात बिफोर चॅटजीपीटी टू एआय डिसरप्शन’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रीय मंडळ व एमईएसचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, महाराष्ट्रीय मंडळाचे सचिव रोहन दामले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रो संजय सोनावणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंटर डिसिप्लिनरी स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ संजय तांबट, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ विवेक सावंत, सीएसीपीईचे प्राचार्य डॉ सोपान कांगणे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोर देसरडा, परिषदेच्या समन्वयिका डॉ श्रद्धा नाईक, एमईएसचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, एमईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, एमईएसच्या नियामक मंडळाचे सदस्य राहुल मिरासदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाचे संचालक डॉ सुदाम शेळके आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे क्रीडा संचालक डॉ उमेश बिबवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याबाबत भारतीय खेळाडू कमी पडतात असे आपण नेहमी पाहतो. आता कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्राच्या साहाह्याने प्रत्येक खेळाडू आणि संघांची यापूर्वी झालेली कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या विकासासाठी कोणकोणते उपाय करता येतील. त्यांची कामगिरी भविष्यात कशी होईल ही माहिती देखील आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या साहाह्याने सहज शक्य होईल. त्यामुळे अशा स्पर्धांकरता खेळाडूंची निवड करण्यासाठी या तंत्राचा उपयोग चांगल्या रीतीने होऊ शकेल असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रातच  एआयचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यामध्ये नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर भविष्यकाळात एआयच्या वापरावर अधिक भर देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारचा प्रयत्न आहे. एआयचे वाढते महत्त्व लक्षात घेत राज्य सरकारने राज्यामध्ये एआय विद्यापीठ सुरु करण्याचा निर्णय घेतला असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात हे विद्यापीठ सुरू होईल.”

भारत हे विकसनशील राष्ट्र म्हणून प्रगती करत आहे, त्यामुळे २०४७ मध्ये आपल्याला अपेक्षित असणारा देश घडवण्यासाठी आपल्याला एआयच्या तंत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजय सोनवणे यावेळी म्हणाले.

स्पोर्ट्स सायन्स प्रोफेशनल्स, शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले, स्पोर्ट्स कोचेस, प्री-सर्व्हिस, इन सर्व्हिस प्रोफेशनल्स, शिक्षक, एज्युकेटर्स, खेळाडू, टेक्नॉलॉजी- इनोव्हेशन एक्सपर्ट्स, संगणक, आयटी, स्पोर्ट्स अभियंते, फिटनेसची आवड असणारे, हेल्थ- वेलनेस प्रोफेशनल्स, क्रीडा व्यवस्थापक असे सर्वजण परिषदेमध्ये सहभागी झाले होते. रोहन दामले यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले. डॉ किशोर देसरडा यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *