
छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, क्रीडा अकादमी नाशिक या संघांनी वर्चस्व गाजवत घवघवीत यश संपादन केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मैदानावर वर्ल्ड डॉजबॉल फेडरेशन, एशियन फेडरेशन, दि इंडियन डॉजबॉल फेडरेशन यांच्या मान्यतेने डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ज्युनियर मुले व मुली व पुरुष आणि महिला गटाच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेतील विजेत्यांना डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र पवार, प्राचार्य राज खंडेलवाल, क्रिकेट प्रशिक्षक विनोद माने, राज्य सरचिटणीस प्रा एकनाथ साळुंके, प्रा मनोहर गावडे, स्पर्धा आयोजन समिती सचिव अभिजीत साळुंके, उपाध्यक्ष संगम डंगर, उपाध्यक्ष महेंद्र कुमार मोटघरे, सहसचिव रमेश शिंदे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष कान्हेड यांनी केले
या स्पर्धेत पंच म्हणून सागर तांबे, पवन धनकर, अक्षय डेंगळे, निखिल म्हस्के, रवीराज आडे, अश्वजीत गायकवाड, मयुरी गायके, अर्शिया खान, साहिल देशमुख, कैलास वीर, कुणाल राठोड, पांडुरंग कदम, विजय चव्हाण, अविनाश लिंबोडे, यशवंत पाटील, आदित्य मुंदे, राकेश वानखडे, आर्यन वाहूळ, आकांक्षा मोरे, राकेश म्हात्रे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा एकनाथ साळुंके, अभिजीत साळुंके, सागर तांबे, डी आर खैरनार, मयुरी गायके, यशवंत पाटील, आशिष कान्हेड, अभिजीत दिखत, गणपत पवार, अश्रफ पठाण, राकेश वानखेडे, महेंद्र गायकवाड, क्रांतिरत्न गायकवाड, वैभव सोनवणे, स्वप्नील सरोदे यांनी पुढाकार घेतला होता.
अंतिम निकाल
ज्युनियर मुली ः १. छत्रपती संभाजी नगर, २. क्रीडा अकॅडमी नाशिक, ३. रायगड,
ज्युनियर मुले ः १. क्रीडा अकॅडमी नाशिक, २. नाशिक, ३. छत्रपती संभाजीनगर.
महिला गट ः १. छत्रपती संभाजीनगर, २. रायगड, ३. लातूर.
पुरुष गट ः १. क्रीडा अकॅडमी नाशिक, २. छत्रपती संभाजीनगर, ३. जालना.