होमिओपॅथी जनजागृतीसाठी रन अँड वॉकमध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग

  • By admin
  • April 9, 2025
  • 0
  • 57 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः  होमिओपॅथीचे जनक डॉ सॅम्युअल हॉनेमन यांच्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रन अँड वॉक उपक्रमात ३०० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते.
 
या रन अँड वॉक फॉर होमिओपॅथी मॅरेथॉन स्पर्धेला विद्यापीठ गेट येथून प्रारंभ झाला. सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर ,आरोग्य डॉक्टर्स असोसिएशन, सिद्धीविनायक पॉलिक्निक, दिगंबर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी श्री भगवान होमिओपॅथी कॉलेज, फोस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथी कॉलेजचे सहकार्य लाभले.

निसर्ग रम्य वातावरणात ३, ५ व १० किमी चालत व धावत सहभागींनी अंतर पूर्ण केले. सहभागींना मेडल्स व ट्रॉफी देण्यात आली. विद्यापीठ गेट ते बुद्ध लेणी व परत हाच मार्ग यासाठी ठेवण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून गुरू मिश्रीलाल होमिओपॅथी कॉलेजचे डॉ योगेश देसरडा, महावीर हॉस्पिटलचे मनीष कुमार, भगवान कॉलेजचे जतीन शाह, फोस्टर डेव्हलपमेंट कॉलेजच्या प्राचार्य डॉ अनुपमा पाथ्रीकर, डीकेएमएम कॉलेजचे डॉ प्रकाश  झांबड यांची उपस्थित होती. 

या स्पर्धेसाठी डॉ विजय व्यवहारे, डॉ अरुण गावंडे,  डॉ प्रशांत महाले, डॉ सुनील पगडे, डॉ संजय लष्करे, फारुक पटेल, डॉ मनोज माळी, डॉ प्रवीण माळी, डॉ दीपक कुंकूलोळ, प्रीती चोरडिया, डॉ विशाल नरवणे, डॉ कार्तिकी नरवणे, डॉ निलीमा गजरे, डॉ हर्षदा शेलार, डॉ मुकेश तांदळे, डॉ राजेश वडोदे, डॉ संदेश सातपुते, डॉ अमोल आगलावे आदींनी परिश्रम घेतले.

१०, ५ व ३ किलोमीटर अंतरातील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक डॉ हॉनेमान यांची प्रतिकृती असलेले मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी मॅरेथॉन हे दुसरे वर्ष होते. या मॅरेथॉनचा उद्देश होमिओपॅथी या शास्त्राचा प्रचार आणि प्रसार असे होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *