
कल्याण ः महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संघटनेच्या ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांची कार्यकारणी सभा नुकतीच एम एच विद्यालय ठाणे येथे संपन्न झाली. या सभेत मितेश जैन यांची कल्याण तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, उल्हासनगर, नवी मुंबई या महानगरपालिका तसेच सर्व तालुक्यांमधील बहुसंख्य शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कल्याण तालुका अध्यक्षपदी मितेश जैन यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, मुंबई विभागीय सचिव अंकुर आहेर यांनी केली.
या बैठकीमध्ये शालेय क्रीडा स्पर्धे विषयी , क्रीडा शिक्षकांच्या समस्या व क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. मितेश जैन हे अनेक विविध संघटनावर कार्यरत असून ॲथलेटिक्स या खेळामध्ये ते प्रशिक्षित आहेत. काम करण्याची असलेली धडपड आणि नवीन काहीतरी करायचं या हेतूने नेहमीच कार्य करत असलेले मितेश जैन यांना दिलेल्या या जबाबदारीचा नक्कीच सार्थकी करतील अशी आशा व्यक्त होत आहे.
कल्याण तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ
मितेश जैन (अध्यक्ष), राज तिवारी (उपाध्यक्ष), संजय पवार (सचिव), गगन सपकाळ (सहसचिव), वृषाली मंत्रे (कार्याध्यक्ष), संतोष घारे (कोषाध्यक्ष), सविता घरत (महिला आघाडी प्रमुख), ऐश्वर्या मदने (संघटक) व संतोष मुंडे (सदस्य).