
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः जे जयेंद्र, हनुमंत सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्युटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत मारिया क्रिकेट क्लबने सिटी टायटन्स क्लबवर ७ गडी राखून मात करीत या स्पर्धेतील घोडदौड कायम ठेवली आहे. नाबाद अर्धशतक झळकावणारा जे जयेंद्र सामन्याचा मानकरी ठरला. हा पुरस्कार त्यास दत्तात्रय काळे यांच्या हस्ते देण्यात आला.

रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात हनुमंत पुजारीच्या शानदार शतकाच्या जोरावर सिटी पोलिस संघाने बागलकोट क्रिकेट क्लबवर १४२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हनुमंत सामनावीर ठरला. त्यास सामनावीर पुरस्कार अतुल बांडीवाडीकर यांच्या हस्ते देण्यात आला. प्रत्येक सामनावीरचे पुरस्कार सुदेश मालप व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. चंदू मंजेली, किरण डिग्गे आणि व महेश सोनवणे यांनी पंच तर गुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक ः १) सिटी टायटन्स ः १७ षटकांत ५ बाद १२२ (विनायक काळे ३०, सर्फराज शेख १९, सचिन टेळे १५, युवान शर्मा, युवराज मनानी, सुमित व सोहम तिवारी प्रत्येकी एक बळी) पराभूत विरुद्ध मारिया क्रिकेट क्लब: १५.३ षटकांत ३ बाद १२४ (जे जयेंद्र नाबाद ५७, ओम पवार २६, ब्रिजेश कुमार १८, इस्माईल पिरजादे ३ बळी).
२) सिटी पोलीस : २० षटकांत ८ बाद १९३ (हनुमंत पुजारी ११६, महेश अरकाल २०, श्रीकांत लिंबोळे १३, एल नागराज ३ बळी, प्रसन्न देसाई २ बळी, अभिजित कोरे व प्रसन्न कोडक प्रत्येकी एक बळी) विजयी विरुद्ध बागलकोट क्रिकेट क्लब ः १३.२ षटकांत सर्वबाद ५१ (सी कार्तिक १०, सदाशिव जगताप ४ बळी, श्रीकांत लिंबोळे २ बळी, दत्ता काळे व अनिल जाधव प्रत्येकी एक बळी.).