
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभागाच्या फुटबॉल मैदानावर राज्य नाइन ए साईड सबज्युनियर, ज्युनियर मुले मुली अजिंक्यपद स्पर्धा १२ व १३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम शनिवारी (१२ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप हे उपस्थित राहणार आहेत. नाइन ए साईड हौशी फुटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र पवार हे अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे महासचिव प्रा एकनाथ साळुंके, फुटबॉल प्रशिक्षक डॉ हाश्मी सय्यद मसूद यांची उपस्थिती असणार आहे.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या प्रसंगी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी डॉ संजय मोरे. राज्य अध्यक्ष राजेंद्र पवार, प्राचार्य राज खंडेलवाल, महासचिव प्रा एकनाथ साळुंके यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला राज्य संघटनेचे संगम डंगर, दिनेश म्हाला, सहसचिव प्रा संतोष खेंडे, लाल सिंग यादव, रेखा साळुंके हे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्रातून ४०० खेळाडू व ५० ऑफिशियल उपस्थित राहणार आहेत. जिल्हा कार्यकारणी आयोजन समितीचे सचिव अभिजीत एकनाथ साळुंके, आयोजन समिती सदस्य बद्रुद्दिन सिद्दीक, डी आर खैरनार, सागर तांबे, डॉ रणजीत पवार, पांडुरंग कदम, बाजीराव भुतेकर, गणेश बेटुदे, अश्रफ पठाण, यशवंत पाटील, आशिष कान्हेड यांनी पुढाकार घेतला आहे.