छत्रपती संभाजीनगर ः महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदा भव्य कुस्ती स्पर्धा भीम केसरी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात येणार आहे.
समाजातील लहान व नवतरुण युवकांनी नशेखोरी पासून लांब ठेवून प्राचीन मल्ल विद्या कुस्तीकडे आकर्षित होऊन मैदानी खेळाकडे वळावे एवढ्याच सामाजिक हेतूने भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन समर्थ कामगार संघटना यांच्यातर्फे ११ एप्रिल, शुक्रवार रोजी भव्य कुस्ती दंगलचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धेत इराण विरुद्ध भारत अशी अंतिम कुस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
इराणचा मल्ल आंतरराष्ट्रीय पहिलवान अमीर मोहम्मद व भारताचा पहिलवान विक्रम कुमार हरियाणा केसरी अशी तुफानी कुस्ती भीम केसरी किताब आणि पाच लाख रुपये बक्षीस व चांदीची गदा यामध्ये असणार आहे व तसेच महाराष्ट्र महाराष्ट्रातील इतर अनेक मातब्बर मल्ल यांच्या तुफानी कुस्त्या याठिकाणी होणार आहेच. सर्व समाजातील सर्व मान्यवरांनी आपापल्या पाल्यांना घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक चेतन तायडे, राजू अमराव, डॉ निलेश अंबेवाडीकर, जगदीश हिवराळे, विष्णू गायकवाड हे असून या स्पर्धेला पंच म्हणून प्रा मंगेश डोंगरे, सोमनाथ बखळे, हरिदास म्हस्के, अर्जुन औताडे, इद्रिस खान, विजू बारवाल, रामेश्वर विधाते,निवेदक म्हणून बाबासाहेब थोरात हे काम पाहतील. शुक्रवारी (११ एप्रिल) सायंकाळी पाच वाजेपासून मिलिंद कॉलेज स्टेडियमवर भीम केसरी कुस्ती दंगल रंगणार आहे.