
जिल्हा अध्यक्ष प्रा सचिन गायकवाड यांची माहिती
सोलापूर ः दुसरे महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा प्रशिक्षकांचे महाअधिवेशन शिर्डी येथे १२ ते १४ एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातून क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा सचिन मारूती गायकवाड यांनी दिली .
या अधिवेशनात प्रथमच महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ सर्व शारीरिक शिक्षण (क्रीडा) व क्रीडा प्रशिक्षक तसेच विना अनुदानित स्तरावर कार्यरत सहाय्यक प्राध्यापक एकत्रित येऊन आपल्या विषयाच्या अध्यापनाकरिता पूर्वीप्रमाणे शालेय व महाविद्यालय स्तरावर कायम पदांच्या नेमणुकीकरिता महाराष्ट्र राज्य शासन दरबारी भरती करण्यासंदर्भात आणि इतर मागण्यांसाठी महाअधिवेशनमध्ये ठराव संमत करून शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती पुणे तसेच महाराष्ट्रातील विविध शारीरिक शिक्षण, क्रीडा, प्रशिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाअधिवेशन आयोजित केले आहे. या संदर्भात आयोजित बैठकीसाठी जिल्हा कार्याध्यक्ष भारत इंगवले सांगोला, शहर अध्यक्ष प्रा संतोष खेंडे, जिल्हा सचिव गोकुळ यादव, शहर सचिव सुहास छंचुरे, सहसचिव वसिम शेख, उपाध्यक्ष गंगाधर घोडके, प्रशांत कदम, अक्कलकोट तालुका अध्यक्ष परमेश्वर हसुरे, माढा तालुका अध्यक्ष संजय यादव, मंगळवेढा तालुका अध्यक्ष बाबर, मोहोळ तालुका अध्यक्ष संतोष साठे, उत्तर सोलापूरचे गणेश भोसले उपस्थित होते.