
२०, २१ एप्रिल रोजी आयोजन
मलकापूर ः महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली जी एच रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अँड कल्चरल आयोजित जी एच रायसोनी मेमोरियल बुलढाणा जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिक्यपद स्पर्धेचे आयोजन बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा अंतर्गत इनडोअर स्पोर्ट्स फेसिलिटी सेंटर जनता महाविद्यालय मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे २० ते २१ एप्रिल दरम्यान संपन्न होणार असल्याचे बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीष लखाणी यांनी सांगितले आहे.
येत्या काळात होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्हा संघ सहभागी होणार असून या स्पर्धेत फक्त बुलढाणा जिल्ह्याती एमबीए रजिस्टर खेळाडू सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत ९ वर्षांखालील मुले व मुली एकेरी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. तसेच ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील मुले व मुली सिंगल व डबल्स तसेच पुरुष व महिला अशा विविध वयोगटात ही स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच राज्य स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळाडूंना राज्य स्पर्धेत खेळण्याची संधी असोसिएशनच्या माध्यमातून मिळणार असल्याची माहिती बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांनी दिली आहे.
या स्पर्धेत बुलढाणा जिल्हातील एमबीए रजिस्टर खेळाडू सहभागी होऊ शकतात तसेच स्पर्धेला येताना सर्व खेळाडूंनी आपले आधार कार्ड तसेच नॉन मार्किंग शुज व गेम पॅन्ट टी शर्ट असणे आवश्यक राहील. या स्पर्धेतून प्राविण्यप्राप्त बुलढाणा जिल्ह्यात संघात निवड करण्यात येणार असून राज्य स्पर्धेत खेळण्याची संधी असोसिएशनतर्फे देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला प्रवेश नोंदवावा. सर्व खेळाडूंनी आपले रजिस्ट्रेशन https: tplive या लिंक वर जाऊन १५ एप्रिल पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर कोणत्याही खेळाडूंना स्पर्धेत खेळता येणार नाही, असे बुलढाणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष खिझर ह्यात खान यांनी कळविले आहे.