
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे २१ एप्रिल ते ५ मे या कालावधीत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राद्वारे मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागीय क्रीडा संकुलात हे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबीर मोफत असून यात टेबल टेनिस, अॅथलेटिक्स, तलवारबाजी या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरात शालेय विद्यार्थी व खेळाडू सहभागी होऊ शकतात. १५ दिवस चालणारे हे शिबीर दररोज दोन सत्रात घेण्यात येणार आहे.
या शिबिरात राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन पुरी (टेबल टेनिस), पूनम नवगिरे (ॲथलेटिक्स) व तुषार आहेर (तलवारबाजी) यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभणार आहे. पालकांनी व खेळाडूंनी २१ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत जास्तीत जास्त विद्यार्थी व खेळाडूंनी या विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.
विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबीर संदर्भात अधिक माहितीसाठी सचिन पुरी (8605012707), पूनम नवगिरे( 9921564368), तुषार आहेर (9028503804), शिल्पा मोरे (9021032373) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.