
छत्रपती संभाजीनगर ः छावणी येथील ज्येष्ठ हॉकी खेळाडू युसूफ शेख यांचे वयाच्या ७०व्या वर्षी निधन झाले. छावणीतील कॅन्टोन्मेंट, रोव्हर्स क्लब संघाकडून तसेच एसटी परिवहन खात्याच्या अनेक राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी गाजवल्या. मध्य फळीतील सेंटर हाफ या जागेवरील अभेद्य भिंत म्हणून त्यांची ओळख होती. निवृत्तीनंतर पण त्यांनी अनेक होतकरू आणि गरीब खेळाडूंना मदत आणि मार्गदर्शन केले. नांदेड येथील गुरु गोविंद सिंग राष्ट्रीय हॉकी स्पर्धा जिल्ह्याला जिंकून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.