
आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई ः गंगा भाग्योदय सांस्कृतिक हॉल, कसबा बावडा येथे शंभूराजे फ्रेंड्स सर्कल आयोजित आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत मुंबईच्या ओमकार नेटके याने मुंबई उपनगरच्या किरण भोपनीकरचा २५-५, ११-२५ व २५-१५ असा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, सहसचिव योगेश फणसळकर व अभिजित मोहिते, खजिनदार अजित सावंत, कोल्हापूर जिल्हा हौशी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड विवेक घाटगे, सचिव विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे अरुण केदार यांनी आमदार सतेज पाटील यांचा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे घड्याळ, वार्षिक अहवाल व शुभेच्छा फलक देऊन सत्कार केला.
पुरुष एकेरी गटातील महत्त्वाचे निकाल
निरंजन चारी (पालघर) विजयी विरुद्ध अजय माळी (पुणे) २५-५, २५-०, नरसिंगराव सकारी (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध विजय कोंडविलकर (रत्नागिरी) २५-१४, २१-१९, संजय मणियार (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध धनंजय राऊत (सातारा) २५-०, २३-९, भरत कोळी (मुंबई) विजयी विरुद्ध शुभम ढाणे (सातारा) २५-४, २५-०.