
शिर्डी येथे शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा महा अधिवेशनाचा समारोप
शिर्डी : ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा पाया रचण्याचे काम खऱ्या अर्थाने शारीरिक शिक्षण शिक्षक हेच करतात. याशिवाय शारीरिक शिक्षण हा प्रत्येक माणसाच्या जीवनातील अविभाग्य घटक आहे. प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षण विषय हा अधोरेखित राहिला हवा, त्यासाठी क्रीडा शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची ठरते. म्हणून इतर विषयांबरोबरच शारीरिक शिक्षण हाही विषय बहुमोलाचा आहे. गेली अनेक वर्ष शारीरिक शिक्षकांची भरती न झाल्यामुळे शारीरिक शिक्षकांचा वर्ग हळूहळू लोप पावत चालला आहे अशी खंत क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी व्यक्त केली.
शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा महा अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी सुहास पाटील हे बोलत होते. भविष्यात विषयाला वेगळी दिशा देण्यासाठी आपणा सर्वांना अभ्यासपूर्ण व एकजुटीने काम करावे लागेल असे आवाहन राज्य क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी शिर्डीतील अधिवेशन समारोप प्रसंगी केले. याप्रसंगी व्यासपीठावर अशोक दुधारे, विभागीय सचिव मच्छिंद्र कदम, शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, समन्वय समितीचे सरचिटणीस ज्ञानेश काळे, संजय पाटील, शिवदत्त ढवळे, सहसचिव डॉ जितेंद्र लिंबकर, डॉ आनंद पवार, प्रीतम टेकाडे, संजय चव्हाण, अमोल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांना विशेष सवलती व प्रोत्साहन मिळावे
ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांना विशेष सवलती आणि प्राधान्य प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे बहुतेक खेळाडू या खेळाकडे वळतील आणि भारताला जास्तीत जास्त पदके मिळतील, खऱ्या अर्थाने जर आपले खेळाडू ऑलिम्पिक पर्यंत जायचे असतील तर आपणाला विविध खेळांच्या संघटना त्या-त्या खेळातील तज्ञ शिक्षकांच्या हातात द्यायला हव्यात. क्रीडा शिक्षकांच्या उत्कृष्ट कामामुळे आज महाराष्ट्र राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थानी आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ क्रीडा संघटक अशोक दुधारे यांनी केले.
या क्रीडा महाअधिवेशनात १७ ठराव मांडण्यात आले आणि त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या प्रसंगी विविध जिल्ह्यांतील क्रीडा पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. क्रीडा महाअधिवेशन अतिशय यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल राजेंद्र कोतकर, विश्वनाथ पाटोळे, ज्ञानेश काळे, शिवदत्त ढवळे, संजय पाटील, अमोल जोशी यांचा राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या शिक्षकांचे आयोजक समितीच्यावतीने विशेष धन्यवाद देऊन आभार मानण्यात आले.
समारोप कार्यक्रमात विभागीय संचालक मच्छिंद्र कदम, स्वाती टेमकर, विश्वनाथ पाटोळे, शिवदत्त ढवळे आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केले. ज्ञानेश काळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पुरुषोत्तम उपर्वट, राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, डॉ जितेंद्र लिंबकर, बी डी जाधव, डॉ आनंद पवार, राजेश जाधव, प्रशांत कोल्हे, जयदीप सोनखासकर, प्रीतम टेकाडे, जालिंदर आवारी, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी संजय पाटील, अमोल जोशी, स्वप्निल कर्पे, अशोक देवकर, सुनील गागरे, नंदकुमार शितोळे, अजित वडवकर, ज्ञानेश्वर भोत, रावसाहेब करंजुले, बबन लांडगे, अजित कदम, महेश कोल्हे, पवन खोडे, किशोर राजगुरू, किरण हंगेकर, काकासाहेब चौधरी, कुंडलिक शिरोळे, कैलास सुपेकर, रामदास रेटवडे, गणेश राऊत, नितीन वरकड यांच्यासह अनेक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.