२६, २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलिस अकॅडमी क्रीडांगणावर आयोजन
नाशिक ः नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनतर्फे २६ व २७ एप्रिल रोजी राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती संयोजक मंगेश राऊत यांनी दिली आहे.
नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनतर्फे आयोजित होत असलेली राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र पोलिस अकॅडमीच्या सिंथेटिक ट्रॅकवर आयोजित होणार आहे. ही स्पर्धा ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने घेण्यात येत आहे असे संयोजक मंगेश राऊत यांनी सांगितले.
ही स्पर्धा रनिंग, जम्पिंग, थ्रोविंग या क्रीडा प्रकारात होणार आहे. या स्पर्धेत सहा ते अठरा वर्षांखालील मुले-मुली व खुला गट यांचा समावेश आहे. या स्पर्धेत आतापर्यंत २१ जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे मॅस्कॉट मोटू पटलू आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ग्रामीण भागातील खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ मुस्तफा टोपीवाला व सचिव मंगेश राऊत यांनी दिली. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी 8767550244 आणि 9167566078 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.