
जळगाव संघ १७ वर्षांखालील मुलींच्या गटात अजिंक्य
छत्रपती संभाजीनगर ः तिसऱ्या राज्यस्तरीय नाईन साईड फुटबॉल स्पर्धेत मुंबई संघाने वर्चस्व गाजवत तिहेरी मुकुट संपादन केला. जळगाव संघाने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.
छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठ मैदानावर राज्यस्तरीय तिसरी नाईन साईड फुटबॉल स्पर्धा सब-ज्युनिअर व ज्युनिअर गटांमध्ये यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारितोषिक वितरण कार्यक्रमास संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र पवार, महासचिव एकनाथ साळुंके, प्राचार्य राज खंडेलवाल, बद्रुद्दिन सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत पंच म्हणून दिनेश म्हाला (अमरावती), लालसिंग यादव (नागपूर), मेघांश शिंदे (जळगाव), भालचंद्र सोनगत (धुळे), अभय बिराज (सांगली), प्रमोद शहा (मुंबई), सय्यद समीर (परभणी), शुभम सपकाळे, लाईक खान, सुलतान खान, अहमद खान, सोहेल खान, अलेस्टर यांनी काम पाहिले. निवड समिती सदस्य म्हणून दिनेश म्हाला, सुशांत जुवाळे, अलेस्टर सिमोन्स, बद्रुद्दीन सिद्दिकी यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे सचिव अभिजीत साळुंके, प्रा एकनाथ साळुंके, डी आर खैरनार, सागर तांबे, अश्रफ पठाण, वैभव सोनवणे, गायकवाड आणि सरोदे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१९ वर्षांखालील मुलांचा गट ः १. मुंबई, २. छत्रपती संभाजीनगर, ३. धुळे, ४. नागपूर.
१९ वर्षांखालील मुलींचा गट : १. मुंबई, २. छत्रपती संभाजीनगर.
१७ वर्षांखालील मुलांचा गट ः १. मुंबई, २. रायगड, ३. नांदेड, ४. भंडारा.
१७ वर्षांखालील मुलींचा गट : १. जळगाव, २. रायगड, ३. भंडारा.