
एमसीए सुपर लीग क्रिकेट ः श्रीवत्स कुलकर्णी, श्रीनिवास लेहेकर चमकले
पुणे ः महाराष्ट्र क्रिके संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १९ सुपर लीग सामन्यात डार्क संघाने छत्रपती संभाजीनगर संघाचा ९६ धावांनी पराभव केला.
डिझायर स्पोर्ट्स कॉर्पोरेशन मैदानावर हा सामना झाला. डार्क संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत पहिल्या डावात ५४.४ षटकात सर्वबाद २०१ धावसंख्या उभारली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर संघ पहिल्या डावात ३३.४ षटकात अवघ्या १२७ धावांत सर्वबाद झाला. डार्क संघाने पहिल्या डावात ७४ धावांची आघाडी घेतली. डार्क संघाला दुसऱया डावात ३६.१ षटकात १५२ धावांवर रोखून छत्रपती संभाजीनगर संघाने सामन्यात पुनरागगमन केले. मात्र, दुसऱया डावात छत्रपती संभाजीनगर संघ ३०.१ षटकात सर्वबाद १३० धावा काढण्यात यशस्वी ठरला. डार्क संघाने ९६ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात राम राठोड याने २१ चेंडूत ५३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने १० चौकार व २ षटकार मारले. रिशी वर्मा याने नऊ चौकारांसह ४५ धावांचे योगदान दिले. भाग्येश नवरत याने ३६ धावा फटकावल्या. त्यात त्याने सात चौकार मारले. गोलंदाजीत पार्थ सानप याने ३५ धावांत पाच विकेट घेतल्या. श्रीनिवास लेहेकर याने सामन्यात (४-२९, ४-५४) आठ बळी घेऊन आपला ठसा उमटवला. कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी याने पहिल्या डावात ४८ धावांत तीन तर दुसऱया डावात ५९ धावांत चार गडी बाद केले. श्रीवत्स कुलकर्णी याने सामन्यात सात बळी टिपले आहेत.