शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

  • By admin
  • April 15, 2025
  • 0
  • 88 Views
Spread the love

शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव, सचिन खिलारी, आदिती स्वामी, ओजस देवतळे यांना थेट पुरस्कार

मुंबई : सन २०२३-२४च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते आर्चर आदिती स्वामी,ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरवित केले जाणार आहे. एकूण ८९ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगरची ज्युदोपटू श्रद्धा चोपडे हिचा समावेश आहे. 

पुण्यात शुक्रवार १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता  म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधान सभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सन २०२२-२३ व २०२३-२४ अशा दोन वर्षांच्या पुरस्कार समारंभाची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली आहे.

मुंबईत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ,दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे एकूण ८९ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. १८ खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करणयात येणार आहे. जीवन गौरव पुरस्कारासाठी ५ लाख, शिवछत्रपती पुरस्कारासाठी ३ लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.

पुरस्कराच्या घोषणेनंतर मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची गौरवशाली परंपरा आहे. पुण्यात दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येणार आहे.

२००१ पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची परंपरा सुरू झाली. पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. १९७९ ते १९८२ कालावधीत १०६ राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ८ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. १९७८ मध्ये केंद्र शासनाच्या अर्जून पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार

शकुंतला खटावकर (पुणे, २०२३-२४)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

आदिती स्वामी (सातारा), ओजस देवतळे (नागपूर), प्रथमेश जवकार (बुलढाणा), ऐश्वर्या मिश्रा (मुंबई उपनगर), चिराग शेट्टी (मुंबई उपनगर), जेमिमाह रॉड्रिक्स (मुंबई शहर), देविका वैद्य (पुणे), राहुल त्रिपाठी (पुणे), ऋतुराज गायकवाड (पुणे), शिवम दुबे (मुंबई उपनगर), जितेश शर्मा (अमरावती), यशस्वी जयस्वाल (मुंबई शहर), ह्रदय छेडा (मुंबई उपनगर), वैष्णवी फाळके (सातारा), अस्लम इनामदार (अहिल्यानगर), आकाश शिंदे (नाशिक), धनंजय पांडे (रायगड), किरण जाधव (सातारा), सांजली वानखडे (अमरावती), उदय उत्तेकर (ठाणे), मंजिरी अलोणे (अमरावती), यशदीप भोगे (अमरावती), यमुना लडकत (पुणे), किरण भोसले (कोल्हापूर), अक्षया वारंग (मुंबई शहर), अजय पेंडोर (नांदेड), श्रुती जोशी (नागपूर), धनंजय जाधव (सांगली), अंकुश पोवटे (सांगली), ऋतिका गायकवाड (नाशिक), मयूर पवार (सातारा), ईशिता रेवाळे (मुंबई उपनगर), संयुक्ता काळे (ठाणे), राही पाखळे (ठाणे), आदर्श भोईर (ठाणे), श्रद्धा कडुबाळ चोपडे (बजाजनगर क्रीडा मंडळ, छत्रपती संभाजीनगर), कल्याणी पाटील (कोल्हापूर), मृण्मयी साळगांवकर (नाशिक), सानिया शेख (पुणे), स्वस्तिका घोष (ठाणे), पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर), राहुल बैठा (ठाणे), मानसी मोहिते (रायगड), दीपाली गुरसाळे (सांगली), अभिषेक निपाणी (कोल्हापूर), सृष्टी भोसले (कोल्हापूर), तुषार डुबे (पुणे), स्नेहा तायशेटे (मुंबई उपनगर), जिनेश नानल (पुणे), तृप्ती चांदवडकर (पुणे), ऋषिकेश मालोरे (रायगड), ऐश्वर्या पुरी (कोल्हापूर), प्रीतिश पाटील (जळगाव), रेखा धनगर (जळगाव), प्रदीप पाटील (मुंबई शहर), पूजा यादव (मुंबई शहर), शंकर गदाई (अहिल्यानगर), गौरी शिंदे (धाराशिव), ऋषिकेश मुरचावडे (मुंबई उपनगर), शुभंकर खवले (मुंबई उपनगर), शिल्पा डोंगरे (धाराशिव), छकुली सेलोकर (नागपूर), वैभव श्रीरामे (नागपूर), आकांक्षा कदम (रत्नागिरी), योगेश धोंगडे (नागपूर). आदित्य गिराम (२०१९-२०), वैदेही देऊळकर (२०२१-२२).

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक : प्रवीण ढगे (पुणे, जिम्नॅस्टिक्स), गोविंद पवार (पुणे, कुस्ती), शिवशंकर भावले (लातूर, कुस्ती), प्रवीण बागल (धाराशिव, खो-खो), मानसिंग पाटील (कोल्हापूर, दिव्यांग), गणेश देवरुखकर (मुंबई उपनगर, मल्लखांब).

जिजामाता पुरस्कार : रचना धोपेश्वर (पुणे, पॅरा ज्युदो).

राज्य साहसी क्रीडा पुरस्कार

कृष्णा ढोकले (पुणे), तन्वी देवरे-चव्हाण (नाशिक).

राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग)

मंगला अडम्बर (नागपूर), सचिन खिलारी (सांगली), दिलीप गावित (नाशिक), संस्कृती मोरे (सातारा), आर्यन जोशी (ठाणे), साक्षी बनसोडे (पुणे), वैष्णवी मोरे (पुणे), संतोष गाढे (पुणे), ज्योती गडेरिया (भंडारा), प्रेमकुमार आळे (पुणे). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *