
नागपूर : केरळ स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डिफ, तिरुवनंतपुरम, केरळ यांनी ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय डेफ सिनियर स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये अक्षय नवले याने कांस्य पदक जिंकून आपला ठसा उमटवला.
अक्षय नवले याने ५० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये ०.४४:०८ सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले. अक्षय नवले हा अॅक्वा स्पोर्ट्स क्लबचा नियमित सदस्य आहे आणि डॉ. प्रवीण लामखडे व आस्का लेव्हल ५ प्रशिक्षक विशाल चांदुरकर (फ्लोरिडा, यूएसए) यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
अक्षय नवले यांचे अॅक्वा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मोहन नाहटकर, सचिव मंगेश गद्रे, मिडलँड स्पोर्ट्सचे संचालक प्रशांत उगेमुगे, उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) मिडलँड स्पोर्ट्स प्रीती लांजेकर, व्यवस्थापक (ऑपरेशन्स) मिडलँड स्पोर्ट्स अश्विन जनबंधू, त्यांचे पालक, अॅक्वा स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंचे पालक आणि शहराच्या कानाकोपऱ्यातील क्रीडाप्रेमी यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.