
उत्तर प्रदेशने मणिपूर हॉकीचा ५-१ असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले
झांसी : हॉकी पंजाबने डिव्हिजन ‘अ’ मध्ये हॉकी मध्य प्रदेशचा ४-१ असा पराभव करून प्रतिष्ठित १५ व्या हॉकी इंडिया सिनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद पटकावले. तसेच, उत्तर प्रदेश हॉकीने मणिपूर हॉकीविरुद्ध ५-१ असा विजय मिळवून तिसरे स्थान पटकावले.
अंतिम सामन्यात, हॉकी पंजाबने हॉकी मध्य प्रदेशचा ४-१ असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. जुगराज सिंग (३०’, ४९’) याने चमकदार कामगिरी बजावत दोन गोल केले आणि अंतिम फेरीत आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले. जसकरण सिंग (३८’) आणि मनिंदर सिंग (४६’) यांनीही प्रत्येकी एक गोल करून प्रतिस्पर्ध्यापासून सामना आणखी दूर नेला. प्रत्युत्तरात, हॉकी मध्य प्रदेशकडून प्रताप लाक्रा (२८’) फक्त गोल करू शकला आणि त्यांच्या मोहिमेचा शेवट रौप्य पदकाने झाला.
विजयाबद्दल आनंदित होऊन, हॉकी पंजाबचा कर्णधार हार्दिक सिंगने आपले मत व्यक्त केले, “सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याची योजना होती आणि मी म्हणू शकतो की मुलांनी चांगली कामगिरी केली. जुगराज याने चांगला खेळ केला. जरी मला अजूनही वाटते की आम्ही येथे काही संधी गमावल्या आहेत परंतु आम्ही विजयाने आनंदी आहोत. स्थानिक स्पर्धेत कामगिरी करणे नेहमीच उत्तम असते, एकूणच स्पर्धा चांगली होती आणि सुवर्णपदक जिंकणे चांगले वाटते”, असे तो म्हणाला.
तसेच, तिसऱ्या-चौथ्या स्थानावर उत्तर प्रदेश हॉकीने मणिपूर हॉकीचा ५-१ असा पराभव केला. कुशवाह सौरभ आनंद (२९’, ४९’) त्याच्या संघासाठी दोन गोल करत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. शारदा नंद तिवारी (३५’), दीप अतुल (४८’) आणि शिवम आनंद (६०’) यांनीही प्रत्येकी एक गोल केला आणि त्यांच्या संघाला कांस्यपदक मिळवून दिले. दुसरीकडे, मोइरंगथेम रविचंद्रन सिंग (४५’) यांनी मणिपूर हॉकीसाठी सांत्वन गोल केला.