मुंबई : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या विद्यमाने पहिल्यांदाच १८ व १९ एप्रिल रोजी स्नेहसंमेलन, चर्चा सत्राचे आयोजन बदलापूर (पश्चिम) येथे करण्यात आले आहे.
हे स्नेहसंमेलन, चर्चासत्र फक्त निमंत्रितांसाठी आहे. त्यामध्ये सर्व जिल्हा सचिव यांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे. या चर्चासत्रात संजय सरदेसाई, संजय माधव, राजहंस मेहंदळे, डॉ अनिरुद्ध संकपाळ हे मार्गदर्शन करणार आहेत. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होईल. १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता समारोप होईल. हे स्नेहसंमेलन एम एस ठाकूर फार्म्स, श्री समर्थ कृपा बंगलो, साऊथ इंडियन शाळेजवळ, पाचोन रोड, बदलापूर (पश्चिम) येथे होईल. अधिक माहितीसाठी संजय सरदेसाई, सर कार्यवाह, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, मोबाईल क्रमांक : ९८६९१३१७४४, ८६९१९८३१११ यावर संपर्क साधावा.