
नागपूर ः हिंगणा रायपूर येथील उत्कर्षा प्रमोद जांबूतकर हिची महाराष्ट्र राज्य वीज पारेशान कंपनीत सहायक अभियंतापदी निवड झाली आहे.
वडील प्रमोद जांबुतकर हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक तर आई सुचित्रा जांबुतकर गृहिणी आहेत. जांबुतकर कुटुंबियाची मोठी मुलगी उत्कर्षा जांबुतकर हिचे नर्सरी ते बारावीपर्यंतचे शिक्षण हिंगणा येथील देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे झाले. त्यानंतर तिने पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले व महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीद्वारे घेण्यात आलेल्या सहायक अभियंता पदाच्या परीक्षेत यश संपादन करून घवघवीत यश संपादन केले.
संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतर्फे संस्थेच्या उपाध्यक्ष अरुणा बंग, कोषाध्यक्ष महेश बंग यांनी तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भविष्यातील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर, पर्यवेक्षक अतुल कटरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.