
परभणी ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर, महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशन वतीने सातवी युथ खेलो इंडिया गेम्स स्पर्धा बिहार येथे ४ ते १५ मे दरम्यान संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य निवड चाचणी २२ व २३ एप्रिल रोजी विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे संपन्न होणार आहेत
परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा सेपक टकारा असोसिएशन वतीने परभणी जिल्ह्यातील उत्कृष्ट सेपक टकारा खेळाडूंची निवड १८ एप्रिल रोजी सेलू येथील नूतन विद्यालय येथे होणार आहे. या निवड चाचणीसाठी १ जानेवारी २००७ नंतरची जन्म तारीख असावी. खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, जन्म तारीख प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, आणावे.
निवड चाचणीत खेळाडूंनी अधिक संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, सुयश नाटकर, परभणी जिल्हा सचिव गणेश माळवे, प्रा महमंद इकबाल, प्रशांत नाईक, किशोर ढोके, संजय भुमकर यांनी केले आहे.