मारिया क्लब, परेल वर्कशॉप उपांत्य फेरीत

  • By admin
  • April 18, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः रोशन परते, ब्रिजेश कुमार सामनावीर

सोलापूर ः मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत मारिया क्रिकेट क्लब व परेल वर्कशॉप मुंबई संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात मारिया क्रिकेट क्लबने हैदराबाद कर्नाटक क्रिकेट क्लबला ८ धावांनी नमविले. अष्टपैलू कामगिरी करणारा ब्रिजेश कुमार (८१ धावा व ३ बळी) सामन्याचा मानकरी ठरला.

दुसऱ्या सामन्यात परेल वर्कशॉप मुंबईने मध्य रेल्वे सोलापूर ब संघाचा २ गडी राखून पराभव केला. रोशन परते (२५ धावा व २ बळी) सामनावीर ठरला. हे पुरस्कार पंच असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार टेळे व परेल वर्कशॉपचे रमेश ढाले यांच्या हस्ते देण्यात आला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून सचिन गायकवाड व मजहर मंगोली आणि नंदकुमार टेळे व नवीन माने तर गुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांनी काम पाहिले.

संक्षिप्त धावफलक : १) मारिया क्रिकेट क्लब : २० षटकांत ९ बाद १४० (ब्रिजेश कुमार ८१, शहजाद शाह २४, देवा ठाकूर १६ धावा, व्ही नितीश ४ बळी, एमडी खदिर, नागराज व रोहन राठोड प्रत्येकी १ बळी) विजयी विरुद्ध एचकेसीसी ः १९.३ षटकांत सर्वबाद १३२ (व्ही नितीश २८, सी मारुती २८, एल इनित २१ धावा, ब्रिजेश कुमार ३ बळी, एस रजपांडी, रवींद्र राय व देवा ठाकूर प्रत्येकी २ बळी).

२) सेंट्रल रेल्वे (ब) : २० षटकांत ६ बाद १४४ (समीर शेख ४९, श्रीकांत खोत ४८, मनीष द्रूव नाबाद १५, रोशन परते २ बळी, अभिषेक सिंग व रिशब शर्मा १ बळी) पराभूत विरुद्ध परेल वर्कशॉप, मुंबई ः १९.३ षटकांत ८ बाद १४७ (रुपेश अंबोकर ३६, रोशन परते २५, राहुल सावंत व रवींदर सिंग प्रत्येकी १९ धावा, समीर शेख ३ बळी, मनीष द्रुव २ बळी, दिगंबर माने व संभाजी चौधरी प्रत्येकी १ बळी).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *