
सोलापूर ः राणी कित्तूर चन्नम्मा स्मारक भवन समिती सोलापूर यांच्या वतीने नूमवि शाळा डफरीन चौक येथे झालेल्या वैयक्तिक सूर्यनमस्कार स्पर्धेत लोकमंगल माध्यमिक प्रशालेच्या तिघींनी उल्लेखनीय कामगिरी केली.
आठवी ते दहावीच्या वयोगटात ४०० सूर्यनमस्कार घालत प्रणाली संतोष चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकाविला. पाचवी ते सातवीच्या वयोगटातून वैष्णवी संतोष चव्हाण हिने ३०० सूर्यनमस्कार घालत दुसरा तर अस्मिता मोरेने ४०० सूर्यनमस्कार घालत तृतीय क्रमांक पटकाविला.
या खेळाडूंना रतिकांत म्हमाणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे लोकमंगल समूहाचे अध्यक्ष सुभाषबापू देशमुख, अवंती शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप साठे, कार्यकारी संचालक अभयसिंह साठे, मुख्याध्यापिका शुभांगी साठे व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले.