
विजेत्यांना सुयोग माछर, दीपक कोठारी यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण
छत्रपती संभाजीनगर ः वूड्रिज एमएसएलटीए सुहाना स्मार्ट १० वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत पुण्याच्या पलाश रुचंदानी व आदिरा भगत यांनी विजेतेपद पटकावले.
वूड्रिज शाळेच्या टेनिस कोर्टवर आयोजित करण्यात आलेल्या १० वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या पलाश रुचंदानी याने छत्रपती संभाजीनगरच्या अव्यान घुमरे याचा अटीतटीच्या सामन्यात ५-४, ४-१ असा पराभव करुन विजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात पुण्याच्या आदिरा भगत हिने पुण्याच्या रितिशा नेहे हिचा २-४, ४-०, ५-४ (३) असा पराभव करत अजिंक्यपद मिळवले.
विजेत्या खेळाडूंना माछर पॅकेजिंग कंपनीचे डायरेक्टर सुयोग माछर आणि वूड्रिज हायस्कूलचे अध्यक्ष दीपक कोठारी यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी स्पर्धा संयोजक विशाल औटे, स्पर्धा निरीक्षक प्रवीण गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
१० वर्षांखालील मुलांचा गट ः अंतिम सामना ः पलाश रुचंदानी (पुणे) वजियी विरुद्ध अव्यान घुमरे (छत्रपती संभाजीनगर). उपांत्य सामने ः पलाश रुचंदानी (पुणे) विजयी विरुद्ध विहान मूर्ती (पुणे), अव्यान घुमरे (छत्रपती संभाजीनगर) विजयी विरुद्ध अर्थ सानप (नाशिक).
१० वर्षांखालील मुलींचा गट ः अंतिम सामना ः आदिता भगत (पुणे) विजयी विरुद्ध रितीशा नेहे (पुणे). उपांत्य सामने ः आदिता भगत (पुणे) विजयी विरुद्ध भार्गवी भोसले (सोलापूर), रितीशा नेहे (पुणे) विजयी विरुद्ध प्रग्या जैन (पुणे).