
छत्रपती संभाजीनगर ः मंगळुरू (दक्षिण कर्नाटक) येथे २६ व २७ एप्रिल रोजी आयोजित होणाऱ्या तिरंगी आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या निखिल कालिदास म्हस्के याची भारतीय पुरुष संघात निवड झाली आहे.
ही स्पर्धा मलेशिया, नेपाळ आणि भारत या देशांदरम्यान खेळवली जाणार असून, वर्ल्ड डॉजबॉल फेडरेशन आणि एशियन फेडरेशन यांच्या मान्यतेने दि इंडियन डॉजबॉल फेडरेशन या संस्थेमार्फत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
निखिल म्हस्के हे अनुभवी व यशस्वी खेळाडू असून त्याने सतना येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत (मध्य प्रदेश) रौप्य पदक मिळवले आहे. हसन (कर्नाटक) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पुरुष डॉजबॉल स्पर्धेत त्याने महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद सांभाळले आणि संघाला कांस्य पदक मिळवून दिले.
याशिवाय, वेरूळ येथे झालेल्या राष्ट्रीय मिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. तेलंगणातील गोदावरीखानी (पेदापल्ली) येथे झालेल्या राष्ट्रीय फेडरेशन कपमध्ये देखील त्याने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना चौथा क्रमांक मिळवून दिला होता.
या उल्लेखनीय निवडीबद्दल निखिल म्हस्के याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. त्यामध्ये डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र पवार, महासचिव प्रा एकनाथ साळुंके, सहसचिव प्रा संतोष खेंडे, उपाध्यक्ष प्रा रमेश शिंदे, संगम डंगर, महेंद्र मोटघरे, रेखा साळुंके, विजय मोटघरे, बाल मुकुंद सोनवणे, अभिजीत साळुंके, सागर तांबे, डी आर खैरनार, महेंद्र सोनवणे, गणेश बेटुदे, पांडुरंग कदम, बाजीराव भुतेकर, यश साळवे, अमित प्रधान, गणपत पवार, प्रभारी क्रीडा संचालक संदीप जगताप, पंकज भारसाखळे, उदय डोंगरे, गोकुळ तांदळे, गोविंद शर्मा, असद शेख (लातूर) आणि मोहम्मद रफी यांचा समावेश आहे.