
जळगाव ः जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय कॅरम पटू संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर, योगेश धोंगडे तसेच आंतरराष्ट्रीय महिला कॅरमपटू नीलम घोडके यांचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुणे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते हा शानदार पुरस्कार सोहळा पार पडला.
याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव, आयुक्त यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास सन २०२३–२४ करिता खेळाडू म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले. योगेश धोंगडे याची गेल्या ५ वर्षातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरिल उल्लेखनीय कामगिरी आधारे महाराष्ट्र राज्य सरकारने त्या शिवछत्रपती पुरस्कारांने सन्मानित केले.
याच बरोबर सन २०२२–२३ या वर्षातील सर्व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंना ही पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यात जैन इरिगेशनचो आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर यांचासह जैन इरिगेशनची आंतरराष्ट्रीय महिला कॅरमपटू नीलम घोडके हिलासुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चौघं कॅरमपटूंच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, सुयश बुरकुल, कॅरम व्यवस्थापक सय्यद मोहसिन व इतर सर्व सहकाऱ्यांनी कौतुक केले आहे.