
पुण्याच्या वेंगसरकर संघास हरविले; पूनम माशाळेचे ४ बळी
सोलापूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धेत सोलापूरने अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुणे येथे झालेल्या या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात सोलापूरने पुण्याच्या दिलीप वेंगसरकर संघाचा ५ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पुणे संघाने २१० धावा केल्या. सोलापूर संघाकडून पूनम माशाळे हिने ४ बळी घेत सामना गाजवला. प्रतीक्षा नंदर्गी व भक्ती पवार यांनी प्रत्येकी २ तर साक्षी लामकाने हिने १ गडी बाद केला.

विजयी २११ धावांचे लक्ष्य सोलापूरने ५ गडी गमावत गाठले. सोलापूर संघाकडून आर्या उमाप हिने ४७, प्रतीक्षा नंदर्गी हिने ४७, स्नेहा शिंदे हिने २३, कार्तिकी देशमुखने २२ व भक्ती पवारने २० धावा केल्या.
सोलापूर संघास स्नेहल जाधव, किरण मणियार, मानसी जाधव कदम, सारिका कुरुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील तसेच संयुक्त सचिव धैर्यशील मोहिते पाटील व चंद्रकांत रेंबर्सू यांनी अभिनंदन केले आणि शुभेछा दिल्या.