
नागपूर : डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत नागपूरची स्पृहा शिनखेडे ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली.
राष्ट्रीय स्तरावरील तरुण-तरुणींना यापूर्वी ग्रेटर बॉम्बे विज्ञान शिक्षक संघटनेच्या वतीने डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२४-२५ चा ४४ वा पुरस्कार वितरण समारंभात झाला. या कार्यक्रमात तिला सन्मानित करण्यात आले. बालवैज्ञानिक स्पर्धेत नागपूरच्या स्पृहाने भाग घेतला होता. ती नागपूरच्या रामदासपेठ येथील सोमलवार हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आहे.
स्पृहा तुषार शिनखेडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. तिला चारही टप्प्यांमध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शेवटच्या टप्प्यात १० टक्के विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि शिष्यवृत्ती देण्यात आली. त्यामध्ये नागपूरची स्पृहा शिनखेडे हिने सुवर्णपदक जिंकले. डॉ होमी भाभा स्पर्धेतील स्वतःच्या प्रवासात तिच्या पालकांचे अमूल्य योगदान तसेच तिच्या नातेवाईका कडून, वर्गमित्रांकडून सतत पाठिंबा मिळाला. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले आहे. उच्च स्तरावरून स्पृहावरील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.