
कन्नड (प्रवीण शिंदे) ः जर्मनी येथे होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी बॅडमिंटन स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी संत तुकाराम महाविद्यालयातील खेळाडू नागेश चामले याची निवड करण्यात आली आहे.
जर्मनी येथे जुलै महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी बॅडमिंटन टूर्नामेंटसाठी भारतातील ऑल इंडिया खेळलेल्या पहिल्या पाच विद्यापीठाच्या खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एक आहे. विद्यापीठातून दोन खेळाडू वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या सिलेक्शन ट्रायलसाठी जाणार आहेत. ही निवड चाचणी भुवनेश्वर येथे होत आहे.
या वर्ल्ड युनिव्हर्सिटी सिलेक्शन ट्रायलसाठी संत तुकाराम महाविद्यालयाचा बॅडमिंटनचा उत्कृष्ट खेळाडू नागेश भरत चामले याची निवड झाली आहे. वर्ल्ड बॅडमिंटन युनिव्हर्सिटीसाठी निवडला गेलेला तो संत तुकाराम महाविद्यालयाचा पहिला खेळाडू आहे. त्याच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार किशोर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप निजामपूरकर, संस्थेचे कोषाध्यक्ष त्रिंबकराव करडेल, संस्थेचे संचालक विश्वास बापू मोतींगे, संस्थेचे सरचिटणीस प्रसन्ना पाटील, संस्थेचे संचालक सिद्धार्थ पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ सुनीता देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख डॉ सुहास यादव या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.