
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेकडून विविध क्रीडा विषयक मागण्यांसाठी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेच्या वतीने अनेक वर्षे प्रलंबित असणारे विषय म्हणजे क्रीडा आरक्षण, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू थेट नियुक्ती व ज्या प्रमाणे केंद्रात खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना आरक्षण दिले जाते त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यात देखील खेलो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धेतील खेळाडूंना आरक्षण द्यावे या मागणीसाठी प्रा सागर मगरे, क्रांती इंगोले, समीर गंगोत्रे यांनी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची घेतली भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. यावर क्रीडा मंत्री भरणे यांनी हा निर्णय धोरणात्मक असल्यामुळे आपण सकारात्मक निर्णय घेऊन मुख्यमंत्री यांच्या समोर सादर करू व खेळाडूंच्या हिताचा निर्णय घेऊ अस आश्वासन दिले.