२०० किलोमीटर नाईट ब्रेवेट मोहिम ५४ सायकलपटूंची फत्ते 

  • By admin
  • April 22, 2025
  • 0
  • 163 Views
Spread the love

रात्रीच्या काळोखात धुळे-सोलापूर महामार्गावर पूर्ण केले २०० किलोमीटर अंतर

छत्रपती संभाजीनगर ः आयर्नमॅन नितीन घोरपडे यांनी ऑडॅक्स इंडिया अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे  फिनिक्स रॅडॉनिअर्सतर्फे २०० किलोमीटर नाईट ब्रेवेट आयोजित केली होती. त्यामध्ये ५४ सायकलिस्टने सहभाग नोंदविला आणि त्यापैकी ४५ सायकलिस्टने ही साहसी नाईट ब्रेवेट यशस्वीरित्या पूर्ण केली. 

ही नाईट ब्रेवेट सायकल अँड रन प्रो स्टोअर निराला बाझार येथून सुरू झाली. सायकलिस्ट नगरवाला आणि इनामदार यांच्या हस्ते नाईट ब्रेवेटची सुरुवात करण्यात आली. सर्व सायकलिस्टनी या नाइट राईड ची तयारी मागील महिन्यापासून छान केलेली होती. रात्री काळोखात सायकलिंग करणे तसेच पाण्याची आणि इलेक्ट्रोलची शरीराला वेळोवेळी पूर्तता करणे, इतर मोठ्या वाहनांची रहदारी पाहून सायकलिंग करणे या सर्व आव्हानांना सायकलिस्टनी सामोरे जाऊन ही साहसी राईड पूर्ण केली.

६५ किलोमीटर अंतरावर पाचोड टोल येथे पहिला चेक पॉईंट होता तो जयदीप, गणेश आणि आनंद राजहंस यांनी सांभाळला. या तिघांनी सर्व सायकलिस्टचे वेळ नोंदवून त्यांना ताक आणि पाणी या पॉईंट वर दिले. १२५ किलोमीटर अंतरावर करोडी टोल नाक्याजवळ दर्शन, वैभव यांनी सर्व सायकलिस्टची जेवणाची व्यवस्था केली. यापुढील चेक पॉईंट हा गल्ले बोरगाव हा होता तो मध्यरात्री पासून पहाटे पर्यंत दिलीप औताडे यांनी सांभाळला, तर राईडचा समारोप निराला बाझार येथे झाला. याची जबाबदारी रियाज शेख यांनी सुरेख सांभाळली.

या संपूर्ण नाईट ब्रेवेट मध्ये दर्शन घोरपडे, रियाज शेख, सतीश घोरपडे, दिलीप औताडे, जयेश त्रिभुवन, गणेश भूमकर, जयदीप खेडकर, आनंद राजहंस, गणेश, भार्गवी सोनगीरकर आणि चैत्रा सोनगीरकर यांचे स्वयंसेवक म्हणून सहकार्य लाभले.

सदरील राईड ही सायकलिस्ट कडून सायकलिस्टसाठी आयोजित केली जाते. ही नाईट राईड १३.३० तासात पूर्ण करणे आवश्यक असते, संपूर्ण सायकलिस्टनी सदरील वेळेच्या आत यशस्वीरित्या पूर्ण केली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर व्यतिरिक्त अहिल्यानगर, ओतूर, श्रीरामपूर, शेवगाव, जालना आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून आले होते. 

नाईट ब्रेवेट मधील यशस्वी सायकलिस्ट 
अमर घुले, अतुल जोशी, मनीष खंडेलवाल, सरबजोत सिंह कोहली, संजय अंपळकर, दीपक इधाते, जस्मीत सिंग वाधवा, अक्षय गुरनानी,  कौशिक बारगल, सिद्धार्थ सोनवणे, नगरवाला झवारे, गोरक्षनाथ वामन, प्रसाद कोळेकर, अश्विनी लहाने, गिरीश गोडबोले, शिवाजी राजे, अजय पांडे, वैशाली वाजपे, विजय व्यवहारे, अरुण गावंडे, मल्लिकार्जुन स्वामी, लक्ष्मण साळुंखे, हेमंत भावसार, हर्षद अडळकोंडा, पांडुरंग लहाने, सुजित सौंदलगीकर, चांगदेव माने, सचिन जोशी, रवींद्र जोशी, अनिल देशमुख, पोपट आळंजकर, निर्भय पाटील, मिलिंद खेरुडकर, विनायक शिंदे, विशाल कोटक, विकास झगडे, गणेश बनकर, संजय भिसे, रोहित राऊत, संतोष डुंबरे, आनंद तरके, संतोष वाकळे, ज्ञानदेव चौधरी, कफील जमाल व नितीन घोरपडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *