
महाराष्ट्रात प्रथमच लीग स्पर्धा स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे दर्जेदार आयोजन
मलकापूर ः स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर अंतर्गत सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस सबज्युनिअर प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रात पहिल्यादाच बुलढाणा जिल्हातील क्रीडा क्षेत्राचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात करण्यात आले आहे. सॉफ्ट टेनिस कोर्ट तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे २७ ते २९ एप्रिल दरम्यान लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
या लीग स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण १६ जिल्हा संघ व नामांकित १२५ खेळाडूंसह सोलापूर, धाराशिव, सांगली, पुणे, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, जालना, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम, अमरावती, अकोला व यजमान बुलढाणा यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असणार आहे. या स्पर्धेत सांघिक प्रकार व सिंगल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा लीग कम नाकाऊट असल्याने खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झालेला आहे. सदर स्पर्धा ही टेनिस कोर्ट तालुका क्रीडा संकुल व भाऊ टेनिस कोर्ट मलकापूर येथे होणार आहे. तीन दिवस चालणारी ही स्पर्धा ६ सत्रात होणार असून सकाळी व रात्रीच्या प्रकाशझोतात होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे सचिव विजय पळसकर यांनी दिली आहे.
सदर स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना रोख पारोतोषक व आकर्षक अशी ट्रॉफी तसेच सहभागी सर्व खेळाडूंना वेदांत आयुर्वेद याच्यातर्फे टी शर्ट देण्यात येणार आहेत स्पर्धेत पंच अधिकारी तांत्रिक समिती सदस्य यांची उपस्थितीत सदर स्पर्धा सपन्न होणार आहेत. खेळाडूंसाठी निवास व्यवस्था व जेवणाची व्यवस्था ही आयोजन समिती व प्रायोजक यांच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर चे अध्यक्ष प्रा नितीन भुजबळ यांनी सांगितले आहेत.
सदर स्पर्धेचे दर्जेदार आयोजन होण्याच्या हेतूने राजेश्वर खंगार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या तयार करण्यात आल्या असून यामध्ये खेळाडू व पालक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अविरत मेहनत करत आहेत.