
ईशान, आशानंदिनी, पार्थ, गोजिरी, अमिधा, शार्दुल, करण, अतुल यांना विजेतेपद
मलकापूर ः बॅडमिटन स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा व स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जी एस रायसोनी बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ईशान पाटील, आशानंदिनी टेकाळे, पार्थ काळुसे, गोजिरी पाटील, पार्थ पवार, अमिधा कांबळे, शार्दुल जतकर, शरयू रेवास्कर, करण सावळे, अतुल हाडे यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले. शरयू रेवास्कर हिने वर्चस्व गाजवत चार गटात विजेतेपद मिळवले.
या स्पर्धेत बुलढाणा जिल्हातील सात तालुक्यातील १४ बॅडमिंटन क्लबच्या एकूण १०४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर, जनता कला वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर येथे बॅडमिंटन स्पोर्ट असोसिएशन बुलढाणाचे अध्यक्ष मनीष लखांनी, बुलढाणाचे सचिव विजय पळसकर, राजेश्वर खंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
बक्षीस वितरण समारंभाला बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणाचे अध्यक्ष मनीष लखानी व रेल्वे पोलिस ठाणेदार जसपाल राणा, स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष प्रा नितीन भुजबळ, वीरसिंग दादा राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच सर्व खेळाडूंना रायसोनी फाउंडेशनतर्फे लॅपटॉप बॅग देण्यात आली.
तसेच आगामी काळात सबज्युनिअर ज्युनिअर व सीनिअर पुरुष व महिला राज्य स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंना जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या स्पर्धेत विजेते व उपविजेते खेळाडूंच्या गुणकणांच्या आधारे स्पर्धेत खेळण्यास मिळणार असल्याची माहिती बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांनी दिली.
या स्पर्धेत रेफरी म्हणून दर्शन बावणे, प्रफुल्ल वानखेडे, अतुल हाडे, अनिल जाधव, अविनाश येतरीकर, गौरी बावणे, रामदास रेवास्कर, गणेश खर्चे आदींनी महत्वाची भूमिका बजावली
स्पर्धेचा अंतिम निकाल
९ वर्ष मुले ः १. ईशान पाटील, २. रुद्रंश अग्रवाल. ९ वर्ष मुली ः १. आशानंदिनी टेकाळे, २. आशानंदिनी टेकाळे. ११ वर्ष मुले ः १. पार्थ काळुसे, २. शिवंश राणा. ११ वर्ष मुली ः १. गोजिरी पाटील, २. शिवण्या सरोदे. १३ वर्ष मुले ः १. पार्थ पवार, २. आयुष पवार. १३ वर्ष मुली ः १. अमिधा कांबळे, २. तनिष्का देशमुख. १५ वर्ष मुले ः १. शार्दुल जतकर, २. सार्थक मुळे. १५ वर्ष मुली ः १. शरयू रेवास्कर.
१७ वर्ष मुले ः १. करण सावळे, २. श्रीलिन पवार. १७ वर्ष मुली ः १. शरयू रेवास्कर, २. आरुषी काळुसे. १९ वर्ष मुले ः १. करण सावळे, २. अंशुल जाधव. १९ वर्ष मुली ः १. शरयू रेवास्कर, २. आरुषी काळुसे. प्रथम गट ः १. अतुल हाडे, २. वरद हिंगे. महिला गट ः १. शरयू रेवास्कार, २. कोमल डाळी.