
पुणे ः व्हिक्टोरियस चेस अकादमीचा विद्यार्थी ओम रामगुडे याने दुसऱ्या नम्मा बंगळुरू आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत शानदार कामगिरी नोंदवली.
या स्पर्धेत ओम रामगुडे याने ब श्रेणीत २००० च्या खाली खेळताना १० डावात ६.५ गुणांची कमाई करत तिसरे स्थान मिळवले. या कामगिरीमुळे ओमचे रेटिंग २० एलो गुणांनी वाढले. या शानदार यशाबद्दल व्हिक्टोरियस चेस अकादमीतर्फे ओमचे अभिनंदन करण्यात आले.