
नागपूर ः पटना येथे ५ ते १४ मे या कालावधीत होणाऱया खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सेपक टकरा संघात नागपूरच्या पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
नागपूर जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या पाच प्रतिभावान खेळाडूंचा महाराष्ट्र संघात समावेश करण्यात आला आहे. त्यात मोहम्मद साद, मोहम्मद मोहतसीम, सय्यद उमर, मोहम्मद जुनैद (सर्व अंजुमन हमी-ए-इस्लाम अकादमी, नागपूर) आणि दर्शन दरपुरे (सेंट पॉल अकादमी, नागपूर) या खेळाडूंचा समावेऑश आहे.
हे गुणवान खेळाडू पुण्यातील बालेवाडी येथे ७ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतील, जिथे त्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर महाराष्ट्राचा संघ ३ मे रोजी खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पटनाला रवाना होईल.
या तरुण खेळाडूंच्या निवडीमुळे त्यांच्या शाळांना आणि स्थानिक क्रीडा समुदायाला खूप आनंद आणि अभिमान मिळाला आहे. त्यांच्या प्रशिक्षकांनी आणि मार्गदर्शकांनी त्यांच्या असाधारण कामगिरी करण्याच्या आणि राज्याला गौरव मिळवून देण्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. एनडीएसटीए अध्यक्ष विपिन कामदार, सचिव डॉ योगेंद्र पांडे, जावेद राणा कोषाध्यक्ष एनडीएसटीए, डॉ देवेंद्र वानखेडे, अनीस रझा, डॉ अमृता पांडे, डॉ अमित कंवर यांनी टीम महाराष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत.