
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हास्तरीय सब ज्युनियर वुशु स्पर्धेत अल हिदाया पब्लिक स्कूलचा विद्यार्थी शेख जोहान याने सुवर्णपदक पटकावले. या चमकदार कामगिरीमुळे शेख जोहान याची पुणे येथे होणाऱ्या नॅशनल सिलेक्शन ट्रायलसाठी निवड झाली आहे.
विभागीय क्रीडा संकुलात इनडोअर हॉलमध्ये जिल्हास्तरीय सब ज्युनियर वुशु अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेख जोहान याने आपला दबदबा कायम ठेवून ३० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. जोहानच्या या शानदार कामगिरीबद्दल जिल्हा वुशु संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे व सचिव महेश इंदापुरे व झेड एस वॉरियर अकॅडमीचे अध्यक्ष सय्यद जहुर अली व अल फराद वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सय्यद वाजेद अली व प्रशिक्षक सद्दाम मुसा सैय्यद यांनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.