
पुणे ः व्हिक्टोरियस चेस अकादमीचा विद्यार्थी ओम रामगुडे याने २२०० फिडे रेटिंग खालील दुसऱया महाराष्ट्र बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. ओम याने नऊ डावांत पाच गुणांसह दुसरे स्थान मिळवले. ओम याचे हे क्लासिकल रेटिंग ५४ एलो गुणांनी वाढले आहे. या घवघवीत यशाबद्दल व्हिक्टोरियस चेस अकादमीतर्फे ओमचे अभिनंदन करण्यात आले.