
सोलापूर खेळाडूंची चमकदार कामगिरी
सोलापूर ः विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
पश्चिम महाराष्ट्र व कोकण आयोजित या स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांच्या गटात बार्शीच्या हर्षवर्धन तिवारी याने प्रथम व १३ वर्षांखालील मुलांच्या गटात दुसरा क्रमांक मिळवला. शानदार कामगिरी केलेल्या सर्व खेळाडूंना झेड एम पुणेकर व बार्शीचे प्रशिक्षक गणेश स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंचे सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ राजीव प्रधान, डॉ नितीन तोष्णीवाल. मनीष रावत यांनी अभिनंदन केले.
विविध गटात द्वितीय क्रमांक मिळविलेले खेळाडू ः ११ वर्षे मुली ः शिवानी सानप, १५ वर्षे मुले ः वेदांत खळदे. मुली ः वेदांकिता पाटील. १७ वर्षे मुले ः ओंकार मुळे.