छत्रपती संभाजीनगर नेटबॉल संघाची निवड चाचणी बुधवारी

  • By admin
  • April 28, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

सचिव सतीश इंगळे यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेटबॉल संघटनेतर्फे ३० एप्रिल रोजी जिल्हास्तरीय नेटबॉल संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने ३१व्या सब ज्युनियर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन २५ ते २८ मे या कालावधीत होणार आहे. तसेच सब ज्युनियर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा २८ ते ३० मे या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. दुसरी सब ज्युनियर राष्ट्रीय मिक्स नेटबॉल स्पर्धा ३० व ३१ मे रोजी इंदूर (मध्य प्रदेश) येथे आयोजित करण्यात आली आहे.

यासाठी महाराष्ट्र हौशी नेटबॉल असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे. सदरील निवड चाचणी करीता जिल्ह्यातून उत्कृष्ट खेळाडू निवडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या वतीने ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल सिडको एन ७ छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.

सदरील सब ज्युनियर स्पर्धेसाठी १ मे २००९ किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू पात्र असतील. स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रासह दुपारी ४ वाजता खेळाडूंनी उपस्थित राहावे. खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, बोनाफाईड, जन्म प्रमाणपत्र, ३ पासपोर्ट फोटो, रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय प्रशिक्षक पंच आकाश सरदार, संकेत बोन्गार्गे, हर्षवर्धन मगरे (९७६७८८६४७८, ९८२२२७७३०६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे सुनील डावकर, धर्मेंद्र काळे, रमेश प्रधान, सतीश इंगळे, मनोज बनकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *