
राज्य स्पर्धेसाठी चार खेळाडूंची निवड
निफाड ः जिल्हास्तरीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल संघाने विजेतेपद पटकावले. दक्ष गायकवाड, तमन्ना तांबोळी, करुणा शिंदे, अक्षरा गोळे यांची राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र लगोरी असोसिएशन व नाशिक लगोरी असोसिएशन, नाशिक जिल्हा व क्रीडा सह्याद्री आयोजित ज्युनियर १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी निफाड येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले. तसेच दक्ष गायकवाड, तमन्ना तांबोळी, करुणा शिंदे, अक्षरा गोळे यांची राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत निवड झाली.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सरस्वती विद्यालयाचे चेअरमन नंदलाल चोरडिया, मुख्याध्यापिका ज्योती बागडे, जिल्हा संघटक व राष्ट्रीय पंच विलास गायकवाड, क्रीडा सह्याद्री सदस्य रमेश वडघुले, क्रीडा शिक्षक गणेश पवार इत्यादी उपस्थित होते.
वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत संघाला सुवर्णपदक मिळवून दिले व कर्णधार दक्ष गायकवाड, तमन्ना तांबोळी, करुणा शिंदे, अक्षरा गोळे यांची राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व्ही डी व्यवहारे, संस्थेचे विश्वस्त अॅड आप्पासाहेब उगांवकर, रतन पाटील वडघुले, किरण कापसे, राजेंद्र राठी, अॅड दिलीप वाघवकर, राजेश सोनी, प्रभाकर कुयटे, मधुकर राऊत विश्वास कराड, नरेंद्र नांदे, शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी सानप यांनी अभिनंदन केले व पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रशिक्षक सुभाष खाटेकर, क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.