
नाशिक ः आठव्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत नाशिक सिटी व सांगली जिल्हा या संघांनी विजेतेपद पटकावले.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा एमएमसी क्रीडांगण म्हसरूळ, नाशिक येथे घेण्यात आली. या स्पर्धेत पुरुष विभागात एकूण ११ संघ सहभागी झाले होते, तर महिला गटात ३ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गीरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विलास गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र महिला अध्यक्षा धनश्री गिरी तसेच मुंबई उपनगर जिल्हा सचिव संदीप पाटील, सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार, रायगड जिल्हा सचिव स्वप्नील, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड व सर्व पंच मंडळ उपस्थित होते.
ही स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने घेण्यात आली. उपांत्य फेरीत नाशिक शहर संघाने नाशिक ग्रामीण संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत जालना जिल्हा संघाने हिंगोली जिल्हा संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात नाशिक शहर संघानी जालना जिल्हा संघावर मात करत मुलांच्या गटाचे विजेतेपद प्राप्त केले. महिला गटात सांगली जिल्हा संघाने रायगड जिल्हा संघावर मात करत अंतिम विजेतेपद प्राप्त केले.
पारितोषिक वितरण
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास विलास गिरी, धनश्री गिरी, संदीप पाटील, विजय बिराजदार, सिद्धेश गुरव, कुणाल हळदणकर, संदीप शिंदे, स्वप्नील, विलास गायकवाड, सर्व पंच मंडळ यांची उपस्थिती होती. नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व मान्यवरांचे तसेच संघ, खेळाडू, व उपस्थिताचे आभार मानले.
या स्पर्धेत विजय उमरे. लखन देशमुख, सोमा बिरादार, दर्शन थोरात, प्रथमेश नानजकर, महेंद्र देशमुख, मानस पाटील, धनश्री गिरी, साक्षी गणे, रूतुजा तोरडमल, रोहिणी सकटे, धनंजय लोखंडे, सुनील मोर्या यांनी पंच म्हणून काम केले.
अंतिम निकाल
मुलांचा गट ः १. नाशिक सिटी, २. जालना जिल्हा, ३. नाशिक ग्रामीण, ४. हिंगोली जिल्हा.
मुलींचा गट ः १. सांगली जिल्हा, २. रायगड जिल्हा, ३. नाशिक जिल्हा.