
नागपूर ः केनशिंदो कराटे असोसिएशनतर्फे ब्लॅक बेल्ट ग्रेडिंग आयोजित करण्यात आले होते. यात खेळाडूंना ब्लॅक बेल्टचे वितरण करण्यात आले.
केनशिंदो कराटे असोसिएशनचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक सुमित नागदवणे, राहुल बरमाटे, अपेक्षा डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरा बुद्ध विहार, कपिलनगर रोड टेका नाका या ठिकाणी ब्लॅक बेल्ट ग्रेडिंग घेण्यात आले.
यात जतीन पराते, शेख सरताज अली, पार्थ मिश्रा, सौरभ कावळे, वैष्णवी मोहाडीकर, रिमझिम सिंग, सम्यकांत सांगोलकर, तनुश्री मेश्राम, मानस टोटलवार, आदेश खांडेकर, अर्णव धमगाये, त्रिवेश जांभुळकर, रिद्धिमा आटे, क्रिश वाघमारे यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. या ग्रेडिंगचे यशस्वी आयोजन तौफिक शेख, आयुष नागदवणे, अभिषेक गुरनुले यांनी केले.