
मुंबई ः प्रतिष्ठा न्यूज तर्फे सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या झिंदाबाद पुरस्कार समारंभात मीरा भाईंरच्या श्री गणेश आखाड्याचे वस्ताद वसंतराव पाटील यांना कुस्ती खेळात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल झिंदाबाद राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले.
माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ संपादक संजय भोकरे, माजी आमदार नितीन शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वसंतराव पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सत्कार सोहळा मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन, सांगली येथे संपन्न झाला. तीन दशकांपेक्षा जास्त काळ वसंतराव पाटील कुस्ती खेळात कार्यरत आहेत. वसंतराव पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबदल श्री गणेश आखाड्यातर्फे व भाईंदर वासियांतर्फे त्यांचे खास अभिनंदन करण्यात येत आहे.