
श्रीवत्स कुलकर्णी, राम राठोड, श्रीनिवास लेहेकरची लक्षवेधक कामगिरी
पुणे ः कर्णधार श्रीवत्स कुलकर्णीच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर छत्रपती संभाजीनगर संघाने एमसीए अंडर १९ सुपर लीग स्पर्धेत सांगली संघाविरुद्ध पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेण्यात यश मिळवले आहे.
किंग्ज स्पोर्ट्स क्लब हडपसर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर व सांगली यांच्यात सामना होत आहे. छत्रपती संभाजीनगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवताना सांगली संघाला पहिल्या डावात १५५ धावांवर रोखले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर संघाने धमाकेदार सुरुवात केली. १५.४ षटकात १ बाद ९० अशा भक्कम स्थितीत छत्रपती संभाजीनगर संघ एकवेळ होता. मात्र, त्यानंतर डाव गडगडला. कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी याने दमदार फलंदाजी करत नाबाद ५९ धावा फटकावत संघाला आघाडी मिळवून दिली. राम राठोड याने अर्धशतक ठोकले. छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात सर्वबाद २०२ धावा काढून ४७ धावांची आघाडी घेतली. सांगली संघाने दुसऱया डावात ९ षटकांच्या खेळात बिनबाद ४३ धावा काढल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक
सांगली ः पहिला डाव ः ३३.३ षटकात सर्वबाद १५५ (साई परदेशी ३७, दीप जाधव ८, गणेश बाड २०, कोळी १३, आयुष रक्ताडे ३८, वरद पवार ६, अनीश जोशी नाबाद ७, श्रीनिवास लेहेकर ४-२९, श्रीवत्स कुलकर्णी ३-३९, जय हारदे ३-३८).
छत्रपती संभाजीनगर ः ४०.२ षटकात सर्वबाद २०२ (राम राठोड ६६, रुद्राक्ष बोडके २०, जय हारदे ६, रोहित पाटील १५, राघव नाईक ८, श्रीवत्स कुलकर्णी नाबाद ५९, इतर १९, आयुष रक्ताडे ३-५८, यशराज शिंदे ३-४६, अनीश जोशी २-४२).
सांगली ः दुसरा डाव ः ९ षटकात बिनबाद ४३ (साई परदेशी नाबाद २०, दीप जाधव नाबाद २३).