
बालाजी पाटील जोगदंड, प्रा जयपाल रेड्डी म्हणाले संकुलाची २५ एकर जागा त्वरीत हस्तांतरीत करावी
नांदेड ः नांदेड जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी केली जावी आणि संकुलासाठी तत्काळ २५ एकर जागा हस्तांतरित करावी या मागणीसाठी नांदेड जिल्हा ऑलिम्पिक संघटना व एकविध क्रीडा संघटनेच्या वतीने बालाजी पाटील जोगदंड, प्रा जयपाल रेड्डी यांनी सोमवारपासून (२८ एप्रिल) आमरण उपोषण सुरू केले आहे.
नांदेड जिल्ह्याच्या अस्तित्वापासून जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आलेले नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या शालेय क्रीडा स्पर्धा इतरत्र आयोजित केल्या जातात. जिल्हा क्रीडा संकुलासाठी कौठा असदवन या ठिकाणी २५ एकर जागा आरक्षित केली होती. ही आरक्षित २५ एकर जागा त्वरीत हस्तांतरित केली जावी या मागणीसाठी बालाजी पाटील जोगदंड व प्रा जयपाल रेड्डी यांनी आमरण उपोषण सुरू केले असून ही मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या या उपोषणाला शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गोपिले, अनंत बोबडे, जस्विंदरसिंग रामगडिया, डॉ राहुल वाघमारे, वृषाली पाटील जोगदंड, किशोर पाठक, रामन बैनवाड, डॉ गजानन कदम, डॉ विठ्ठल भंडारे, सचिन नरंगले, मनोज जोशी, डॉ दिनकर हंबर्डे, प्रलोभ कुलकर्णी, प्रशांत आसमाने, राष्ट्रीय खेळाडू कन्हैया खानसोळे, राष्ट्रपाल नरवाडे, संतोष चुनोडे, सुभाष कुरे, मुझेफ शेख, धोंडिबा चिकटवाड, समर्थ सूर्यवंशी, शिवरुद्र उदगीरे, प्रसन्नजीत जाधव, राष्ट्रीय खेळाडू दुर्गेश सूर्यवंशी, आशिष राजपूत, श्रीहरी सातोनकर, दीपक जोगदंड, शशी पारडे, प्रताप राठोड, माधव दुयेवाड, कृष्णा दुयेवाड, विनश्री गडगिळे, किरण नागरे, वैजनाथ नावंदे , विष्णू जगळपुरे, अमोल शेंडगे, कृष्णा गव्हाणे, संतोष मिटकर, अमोल भालेराव, राम जाधव यांच्यासह अनेक खेळाडू व पालकांनी उपोषणात मोठा सहभाग नोंदविला आहे.
जोपर्यंत क्रीडा संकुल निर्मितीसाठी जमीन हस्तांतरित होत नाही तोपर्यंत नांदेडकरांसाठी प्रश्न लावून धरणार असल्याचे उपोषणकर्ते बालाजी पाटील जोगदंड व प्राध्यापक जयपाल रेड्डी यांनी सांगितले.