सोलापुरच्या रुद्र कराटेपटूंना पाच रौप्य व दोन कांस्य

  • By admin
  • April 29, 2025
  • 0
  • 58 Views
Spread the love

मलेशिया ओपन कराटे स्पर्धा

सोलापूर ः क्वालालंपूर येथे नुकत्याच झालेल्या चौदाव्या सायलेंट नाईट मलेशिया ओपन कराटे इंटरनॅशनल्समध्ये शिवस्मारक सोलापूर येथील रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट्स व योग संस्थेच्या पाच कराटेपटूंनी पाच रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई केली.

या स्पर्धेतील सहभागी इंडोनेशिया, मलेशिया व श्रीलंका या देशांच्या प्रतिस्पर्ध्यांवर निसटत्या फरकाने मात केली. संकेत धन्नाईक याने वरिष्ठ गटात वैयक्तिक कुमिते प्रकारात रौप्य, अनुष्का पल्ली हिने कनिष्ठ गटात वैयक्तिक व सांघिक कुमिते प्रकारात रौप्य व अन्वी गाडे हिने कनिष्ठ गटात सांघिक काता प्रकारात रौप्य पटकाविले. तसेच कार्तिका गंधमल हिने सांघिक कुमिते प्रकारात कांस्य आणि आर्या यादव हिने सांघिक कुमितेमध्ये रौप्य तर वैयक्तिक कुमिते प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या कनिष्ठ व वरिष्ठ गटातील एशियन कराटे चॅम्पियनशिप मधील प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जाण्याकरिता पूर्वतयारी म्हणून मलेशिया ओपन स्पर्धेतील अनुभव कामी येत असल्याने ट्रेडिशनल व स्पोर्ट्स कराटे असोसिएशन सोलापूरतर्फे अशा स्पर्धांमधून खेळवून संभावित कराटेपटूंची एशियन स्तरासाठी तयारी करत असल्याचे कोच भुवनेश्वरी संगीता सुरेश जाधव यांनी सांगितले. प्रमुख प्रशिक्षक मिहिर सुरेश जाधव यांनी विजेत्यांचा ऑफलाईन व कोच भुवनेश्वरीने ऑनलाईन सराव करवून घेतला.

यशस्वी खेळाडूंचे शहरमध्यचे आमदार देवेंद्र कोठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार आणि शिवस्मारकचे संचालक गंगाधर धरणे व रंगनाथ बंकापुर तसेच क्रीडा भारतीचे ज्ञानेश्वर मॅकल, भाजप खेल प्रकोष्ठचे यशवंत पाथरुट आणि आयएमएसचे संचालक अमोल व सायली जोशी यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *