सिलंबम स्पर्धेची जबाबदारी योग्य संघटनेकडे द्यावी

  • By admin
  • April 29, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

अध्यक्ष संजय बनसोडे यांची मागणी

पुणे ः महाराष्ट्र राज्यात सिलंबम हा पारंपरिक व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा खेळ विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. अशा खेळाच्या स्पर्धा नियोजनाची जबाबदारी शासनाच्या क्रीडा विभागाने बंदी असलेल्या अथवा गैरप्रकार करणाऱया संघटनांकडे देऊ नये अशी मागणी सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशन महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष संजय बनसोडे यांनी केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना संजय बनसोडे म्हणाले की, राज्यातील अनेक युवा खेळाडू या खेळात सहभाग घेऊन उज्वल भवितव्य घडवू इच्छितात. तथापि, अलीकडच्या काळात काही संघटनांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप (लैंगिक शोषण, अनियमितता, आर्थिक शोषण, फसवणूक वगैरे) सिद्ध झालेले आहेत व त्यांच्यावर शासन स्तरावर (यथास्थिती : भारतीय क्रीडा संहिता २०११ व महाराष्ट्र क्रीडा विकास नियम २०१६ च्या अन्वये) बंदी घालण्यात आलेली आहे.

भारतीय क्रीडा संहिता २०११ व महाराष्ट्र क्रीडा विकास नियम २०१६नुसार केवळ शासनमान्य व प्रमाणित संघटनांमार्फत स्पर्धा आयोजित व पार पाडल्या जाव्यात. खेळाडूंना सुरक्षित, पारदर्शक व नैतिक पर्यावरण उपलब्ध करून देणे क्रीडा संस्थांची व संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. बंदी घालण्यात आलेल्या अथवा न्यायप्रविष्ट संघटनांना कोणत्याही प्रकारच्या शालेय, जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग न देणे आवश्यक आहे. अशा बंदी असलेल्या अथवा गैरप्रकार करणाऱ्या संघटनांनी आयोजित केलेल्या सिलंबम स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊ नये. या संदर्भात याआधीही लेखी हरकत दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *