जीवेक घोटेनकर, यशराज शिंदे, आयुष रक्ताडे विजयाचे हिरो
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए अंडर १९ सुपर लीग स्पर्धेत सांगली संघाने छत्रपती संभाजीनगर संघावर ५५ धावांनी विजय नोंदवला. आयुष रक्ताडे याने सामनावीर पुरस्कार मिळवला.
किंग्ज स्पोर्ट्स क्लब हडपसर मैदानावर हा सामना झाला. या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात सांगली संघाविरुद्ध ४७ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱया डावात सांगली संघाने २४५ धावसंख्या उभारुन सामन्यावर पकड बसवली. निर्णायक विजय मिळवण्याच्या प्रयत्नात छत्रपती संभाजीनगर संघाने आक्रमक फलंदाजी केली. त्याचा फटका संघाला बसला. छत्रपती संभाजीनगर संघाचा दुसरा डाव ३७.४ षटकात १४३ धावांत संपुष्टात आला. सांगली संघाने ५५ धावांनी सामना जिंकला.
संक्षिप्त धावफलक
सांगली ः पहिला डाव ः ३३.३ षटकात सर्वबाद १५५ (साई परदेशी ३७, दीप जाधव ८, गणेश बाड २०, कोळी १३, आयुष रक्ताडे ३८, वरद पवार ६, अनीश जोशी नाबाद ७, श्रीनिवास लेहेकर ४-२९, श्रीवत्स कुलकर्णी ३-३९, जय हारदे ३-३८).
छत्रपती संभाजीनगर ः ४०.२ षटकात सर्वबाद २०२ (राम राठोड ६६, रुद्राक्ष बोडके २०, जय हारदे ६, रोहित पाटील १५, राघव नाईक ८, श्रीवत्स कुलकर्णी नाबाद ५९, इतर १९, आयुष रक्ताडे ३-५८, यशराज शिंदे ३-४६, अनीश जोशी २-४२).
सांगली ः दुसरा डाव ः ५३.१ षटकात सर्वबाद २४५ (साई परदेशी २०, दीप जाधव ४६, अनीश जोशी १०, जीवेक घोटेनकर १०२, वरद पवार ३२, पार्थ पोतदार ९, श्रीनिवास लेहेकर ६-८३, जैद पटेल ३-७, जय हारदे १-६४).
छत्रपती संभाजीनगर ः दुसरा डाव ः ३८ षटकात सर्वबाद १४३ (राम राठोड ४२, रुद्राक्ष बोडके ८, रोहित पाटील १६, राघव नाईक २५, रुद्र सूर्यवंशी १६, श्रीवत्स कुलकर्णी १२, अविनाश साह ८, यशराज शिंदे ५-३१, आयुष रक्ताडे ४-५६, अनीश जोशी १-३५).