
पुणे ः व्हिक्टोरियस चेस अकादमीची विद्यार्थीनी व्हेनेसा खिलानानी हिने रोटरी क्लब ऑफ पुणे बंड गार्डन आणि १२ वर्षांखालील राजवीर फाउंडेशन इनव्हिटेशनल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. तिने सहा डावांत पाच गुणांसह तिसरे स्थान मिळविले. या कामगिरीबद्दल व्हिक्टोरियस चेस अकादमीतर्फे व्हेनेसा हिचे अभिनंदन करण्यात आले.